रोखठोक महाराष्ट्र विशेष वृत्त
हडपसर (विशेष प्रतिनिधी )
पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर परिसरात नागरिकीकरणाबरोबर गुन्हेगारी प्रचंड वाढली असून यावर अंकुश बसविण्याची जबाबदारी नव्यांर रुजू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आहे, रमेश साठे यांची मुदत पूर्ण झाली नसताना अल्पावधीत विशेष शाखेत बदली झाली तर बाळकृष्ण कदम यांनी हडपसर पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. येथील अवैध धंदे व वाढलेली गुन्हेगारी नव्या अधिकाऱ्यांपुढे असलेले आव्हान आहे.
हडपसर उपनगर झपाट्याने वाढत आहे, नागरिकीकरणाबरोबर दोन टाऊनशीप असलेला हा परिसर एका बाजूला उच्चभ्रू लोकवस्ती तर दुसरीकडे स्लम भाग पालिकेचे म्हाडा व एसआरए प्रकल्प यामुळे येथील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. सुनील तांबे हडपसर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना त्यांनी राजकीय दबाव झुगारून कारवाईचा धडाका लावला अन गुन्हेगारी व गुन्हेगार यांच्यावर जरब बसवली होती, गुन्हेगार व संघटनेचे दुकानदार पोलीस स्टेशन कडे फिरकत नव्हते एवढा धाक होता, राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाही दणका दिल्याने तत्कालीन भाजप सरकारच्या काळात त्यांची राजकीय दबावातून बदली झाली अन हडपसर कर एका “सिंघम” अधिकाऱ्यास मुकले त्यांनतर आलेले पोलीस अधिकारी मात्र सामाजिक संघटना व काही निवडक लोकांना हाताशी धरून काम करत होते याकाळात अवैध धंद्यांचे पेव फुटले अनेक खोटे गुन्हे दाखल झाले त्यातच खुनाचे सत्र सुरू झाले, गॅंगवार होऊन अनेक मर्डर या काळात झाले, गुन्हेगार चांगलेच सोकावले होते, पोलिसांचा धाक कमी झाल्याने सेटलमेंट दुकानदारांनी आपली दुकाने थाटली होती. गल्ली बोळात दारू, गांजा, गुटखा विक्री सुरू झाली याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जात असल्याने येथील सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील मोठा भाग काही महिन्यांपूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे येथील लोड वाढला पर्यायाने अवैध व्यवसाय फोफावले. लोकसंख्या व पोलिसांची मर्यादित संख्या लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित वाटू लागले याचा फायदा घेत गर्दीच्या ठिकाणी सोने, मोबाईल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले. लहान वयाच्या मुलांमध्ये वाढलेली गुन्हेगारी हा येथील गंभीर प्रश्न असून याकडे कानाडोळा करून चालणार नाही. तीन पोलीस स्टेशन चा भार असलेले हडपसर पोलीस स्टेशन चालविणे हे एक मोठे दिव्यच आहे. बाळकृष्ण कदम नव्याने हडपसर पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत, परिसर मोठा, पोलीस संख्याबळ कमी त्यामुळे गुन्हेगारी थोपविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
हडपसर परिसर सुरक्षित करण्यासाठी काय करावे
पोलीस स्टेशन परिसरात सेटलमेंट पंटर ला आवर घालावा
अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी
सामाजिक/राजकीय संघटनांचा बुरखा पांघरून दुकानदारी करणाऱ्यांवर अंकुश असावा
स्लम परिसर व अल्पवयीन मुलांवर प्रबोधन व्हावे
समाजातील जागरूक नागरिकांची समिती करावी
भ्रष्ट पोलिसांवर कंट्रोल करावा
रात्रीचे पेट्रोलिंग प्रमाण वाढवावे
तोतया सामाजिक कार्यकर्ते व खंडणीबहाद्दर यांवर कारवाई व्हावी
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक उपाययोजना हवी
मार्केट परिसरात खिसेकापू, मोबाईलचोरांना शासन व्हावे