पुणे

बिहारमध्ये पुन्हा एनडीएच; मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार नितीश कुमार

पाटणा – बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला अखेर बहुमत मिळाले आहे. यासह बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेतील.

सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत सत्ता काबीज करण्यासाठी कॉंटे की टक्कर पहावयास मिळाली. एनडीएने थोड्या जागांच्या फरकाने विरोधकांच्या महाआघाडीला मागे टाकत बहुमताचा आकडा पार केला. सर्व २४३ जागांच्या निकालानुसार, एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. यामध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.

तर, महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

दुसरीकडे, बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून एनडीएला बहुमत मिळाले आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x