सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना वेगवेगळ्या प्रकारे समाजातील लोकांना सहकार्य व मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते शब्बीरभाई धोलकावाला यांनी
अनेक लोकांना वेळोवेळी होईल ती मदत करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका कौटुंबिक प्रकरणात त्यांनी एका महिलेला नुकताच न्याय मिळवून दिलेला आहे. रजीया हुजेफा बुटवाला या महिलेस त्यांनी तिच्या कौटुंबिक प्रकरणांमध्ये होईल तेवढी मदत करू झालेल्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. या महिलेला पोटगी मिळालेले आहे तसेच नवऱ्याच्या असलेल्या मालमत्तेवर मनाईहुकूम देखील मिळालेला आहे.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस.देशपांडे लष्कर न्यायालय पुणे यांनी कौटुंबिक हिंसाचातपासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 चे कलम 12 प्रमाणे हा निकाल दिलेला आहे.
न्यायालयाने दिलेला आदेश पुढील प्रमाणे…
१.अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२.जाबदेणार क्र.३ याने अर्जदारास व तिच्या मुलांना दरमहा रुपये पाच हजार प्रत्येकी अंतरिम पोटगी अर्ज दाखल तारखेपासून ते मूळ अर्जचा अंतिम निर्णय होईपर्यंत द्यावी.
३.जाबदेणार क्र.३ याने अर्जदारास घरभाड्यापोटी दरमहा रुपये पाच हजार अर्ज मंजूर तारखेपासून द्यावेत.
४.सर्व जाबदेणार यांनी अर्जदारवर कुठल्याही प्रकारे कौटुंबिक हिंसाचार करू नये तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये तसेच निशाणी- ६ यातील नमूद मालमत्ता म्हणजेच ई १/१५ व्हील मिस्ट्र गार्डन, एन.आय.बी.एम रोड,कोंढवा खुर्द,पुणे -४११०४८ व आलिफ जनरल स्टोअर्स, फ्लॅट नं.८,सुरुर बिल्डींग, सेंट मॅथ्यु शाळेखाली,साळुंके विहार रोड,कोंढवा खुर्द,पुणे ४११०४८ या बाबत कुठल्याही तिऱ्हाईत व्यक्तीशी व्यवहार करू नये तसेच सदरील मालमत्ता कोणासही पुढील आदेशापर्यंत हस्तांतर करू नये.
५.जाब देणार क्र.३ याने अंतरिम पोटगीची थकीत रक्कम अर्जदारांना दोन महिन्याच्या आत अदा करावी.
६.प्रस्तुत आदेशाची प्रत अर्जदार,जाबदेणार,संरक्षण अधिकारी व संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी अंमलबजावणीकरिता विनामूल्य देण्यात यावे.