पुणे (प्रतिनिधी)
आज दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्हा सैनिक बोर्ड या ठिकाणी माजी सैनिक वेलफर फंडासाठी अमीर चिकन इंटेक्स कंपनीकडून फंडासाठी चेक सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी सैनिक वेल्फेअर फंडाचे कार्यकारी अधिकारी सुभाष सासणे यांच्याकडे कंपनीचे सीईओ मधुकर गुळींग व अमीर कंपनीचे स्ट्रॅटजी मॅनेजर धनंजय वळकुंजे यांनी चेक सुपूर्त केला. सैनिक फंडासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील शहीद जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे यांना तहसीलदार प्रांत यांच्या सूचनेनुसार व यांच्याकडून उपलब्ध होणाऱ्या या यादीनुसार जे अत्यंत गरजू आहेत अशा व्यक्तींच्या कुटुंबियांना अमिर चिकन कंपनी स्वतःच्या उत्पन्नातील प्रतिकिलो एक रुपया अशा व्यक्तींपर्यंत थेट पोहोच करणार आहे, आज दिवाळीच्या निमित्तानं पहिला चेक जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्याकडे आज सुपूर्त करण्यात आला व इथून पुढेही हे कार्य कायमस्वरूपी सुरूच राहील असे कंपनी सीईओ मधुकर सर यांनी त्यांना ग्वाही दिली. याप्रसंगी सर्व जिल्हाधिकारी प्रतिनिधींनी अमीर कंपनीला तसेच सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या तसेच व्यवसायवृद्धीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व केलेल्या कामाचे भरभरून कौतुक करण्यात आले त्याप्रसंगी मधुकर सर यांनी त्यांना तुम्ही संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली त्यामुळे आम्ही आज आमच्या घरामध्ये सुरक्षित आहोत व आम्ही कोणतेही मोठे काम करीत नसून आम्ही करीत असलेले काम हे अत्यंत छोटे आहे सैनिक जे देशासाठी करतात ते काम अत्यंत महत्त्वाचे मोलाचे असून आम्ही कंपनीच्या माध्यमातून करीत असलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे व भविष्यात ही मदत मोठ्या प्रमाणात वाढवत जाऊन तुम्ही जी कुटुंबे गरजू असतील ज्यांचे घरातील मुले. सैनिकांच्या विधवा अपंग निवृत्त सैनिक यांना त्यांच्या आयुष्य उभारणीसाठी भरीव काम करण्याची व त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अमिर चिकन पूर्ण क्षमतेने काम करेल असे स्पष्ट करण्यात आले.
33 elementi nedir?