मुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले कि, आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलो आहे. यावर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले. बाळासाहेबांचे आणखी एक स्वप्न होते. मराठी माणूस एक पाऊल पुढे गेला पाहिजे. ते स्वप्नही आम्ही लवकरच पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले आहे.
मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांची कुंचल्याने भंबेरी उडविणारे ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला. मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन, असे ट्विट त्यांनी केले आहे.
मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) November 17, 2020
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.