दौंड :- शिरापूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईत 9 फायबर बोटी, 8 सेक्शन बोटी, एक जेसीबी असा एकूण 2 कोटी 35 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त ( sand-mafia-update-police-again-seized-equipment-worth-rs-2-crore-35-lakh) केला आहे. तसेच 8 जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवडाभरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. यामुळे वाळू उपसा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
दौंडचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस आणि त्यांच्या टीमने भीमा नदीच्या पात्रात शिरापूर येथील बोटींवर जाऊन फायबर बोटी जप्त केल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी पोलिसांकडून एक कोटी 20 लाखांच्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी उद्धवस्त केल्या होत्या. त्यानंतर सोमवारी देखील पोलिसांकडून 2 कोटी 50 लाख रुपयांच्या वाळू उपसा करणाऱ्या बोटी जप्त केल्या. त्यामुळे आठवडाभरात सुमारे 3 कोटी 70 लाख रुपयांची कारवाई पोलिसांनी केली आहे.
या कारवाईमध्ये हवालदार दीपक कुमार वायकर, नंदकुमार केकान, सुभाष डोहिफोडे, धनंजय गाढवे, पवार आणि होमगार्डचे जवान सहभागी झाले होते. ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.