पुणे

लोणी काळभोर परिसरात ड्रग्ज विक्रेत्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक

थेऊर – लोणी काळभोर पोलिस स्टेशन परिसरात आमली पदार्थ विक्री करणारा इसम गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आला असून त्याच्याकडून 6.850 ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केले आहे.या कारवाईनंतर लोणी काळभोर परिसरात ड्रग्ज विक्रीचे जाळे पसरलेले असणार हे अधोरेखित झाले आहे. सध्या या ठिकाणी गांजाची व अवैध दारुची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून याचे जाळे पोलिस अधीक्षक उध्वस्त करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अशी माहिती दिली की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे सोलापूर महामार्गावर गस्तीवर असताना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की लोणीकाळभोर येथील कवडीपाट टोल नाका परिसरात एक इसम मैफड्रोन( DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे यावर टोल नाक्यावर सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतले व त्याची अधीक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अशोक किट्टू पुजारी (वय 47 वर्षे) सध्या रा गंगाधाम कासा ग्रीन सोसायटी ५ वा मजला फ्लॅट क्र 505 कात्रज पुणे मूळ रा किट्टू पुजारी पंडित बिल्डिंग पहिला मजला फ्लॅट नं १३ राजरामोहन रॉय कामा बाग समोर गिरगाव मुंबई असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट च्या उजव्या खिश्यात प्लास्टिकच्या पुडी मध्ये मेफेड्रोन (DRUGS) नावाचा अंमली पदार्थ सापडले.

मुद्देमालासह इसम पुढील तपास कामी लोनिकळभोर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील ,उपविभागीय पोलिस अधिकारी हवेली विभाग सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरेपो हवा राजेंद्र पुणेकर पो ना विजय कांचन पो कॉ धिरज जाधव पो कॉ अक्षय नवले यांनी केली आहे .

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x