हडपसर (26 )सर्वधर्म समभाव जोपासणारी अशी भारतीय राज्यघटना आहे. प्रत्येक जातीधर्मातील स्त्री-पुरुषांना नागरिकत्वाचा हक्क या संविधानाने दिला आहे. जगातील सर्व राज्य घटनांचा अभ्यास करून आपल्या भारतीय संस्कृतीला पोषक ठरेल अशी अशी राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिली आहे .भारतीय संस्कृतीमधील विविधतेला एकात्म व एकसंघ ठेवण्याचे काम संविधानाने केलेले आहे व भविष्यातही संविधानामुळेच भारत एकात्म व एकसंघ राहील. स्वातंत्र्य, समता ,बंधुता, सामाजिक ,आर्थिक व राजकीय न्याय, वैचारिक अभिव्यक्ती ,श्रद्धेचे व धार्मिक स्वातंत्र्य देणारे भारतीय संविधान आहे .असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. दत्तात्रय वाबळे यांनी एस .एम.जोशी कॉलेजमध्ये मांडले. ते संविधान दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते .ते म्हणाले की, धर्मनिरपेक्षता हे भारतीय संविधानाचे खास वैशिष्ट्य आहे .भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही संस्कृती असणारा देश आहे. युवकांनीही संविधान वाचले पाहिजे. समजून घेतले पाहिजे. आपली लोकशाही अजून बलवान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे ते म्हणाले उपप्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले .या संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या सरनाम्याचे अभिवाचन सामुहिकरित्या करण्यात आले. राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सरोज पांढरबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महादेव जरे ,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक, सर्व विद्यार्थी यांनी ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेतला. डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी आभार मानले.
विविधतेतून एकतेचा संदेश भारतीय संविधान देते – डॉ.दत्तात्रय उबाळे
Subscribe
Login
0 Comments