महात्मा फुले यांच्यास्मृतिदिनानिमित्त मराठवाडा बहुउद्देशीय संस्था व परिवर्तन महिला आधार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वारसा ‘ज्योती-सावित्रीचा,गौरव समाजरत्नांचा’ कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोनाच्या लॉकडाउन काळात कोरोनाबाबत जनजागृती ,आरोग्य यावर सातत्याने वार्तांकन केल्याबद्दल विविध माध्यमामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधींना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रमोद गिरी, जयवंत गंधाले, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश सहसंघटक अनिल मोरे,अमित मेहंदळे, वसंत वाघमारे, रामचंद्र कुंभार, वैद्यकीय सेवेबद्दल डॉ मंगेश वाघ, डॉ समीर तांबोळी,डॉ किशोर शहाणे डॉ छायाताई जाधव,सामाजिक – राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यसाठी सरपंच अशोक न्हावले,महेंद्र बनकर,संजय सातव,अजरुद्दीन सय्यद,महेश नलावडे,मजर फूड बँक,बापूसाहेब भूमकर,प्राचार्य रामदास अभंग, प्राचार्य उज्वला सावंत यांच्यासह पत्रकार, डॉकटर्स, सामाजिक कार्यकर्ते
,शिक्षक, संस्थाचालक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुने म्हणून महात्मा फुले यांचे वंशज नीताताई होले,कर्नल पी सुरेश,भाजप नेते विकास रासकर,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,
भूमाता तृप्ती देसाई,सरपंच शिवराज घुले, अशोक शिंदे,नगरसेवक मारुती तुपे,सुनील बनकर,प्रमोद कोद्रे,संजय शिंदे,नगरसेवक योगेश ससाणे,
संदीप राउत, नीता भोसले, मीनाक्षी आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी महिलांना सन्मान व पुरुषांच्या बरोबरीने जगण्याचा आधार दिला,
मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व महिला परिवर्तन आधार केंद्र जनसामाण्यांकरिता योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून फुले यांच्या विचार जपण्याचे काम करत आहे या शब्दांत कार्यक्रमाच्या अध्यक्षा नीता होले व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा लगड यांनी केले तर सूत्रसंचालन महेश टेळे यांनी केले.
मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व परिवर्तन महिला आधार महिला केंद्रचा पुरस्कार सोहळा संपन्न
Subscribe
Login
0 Comments