पुणे

कला परिवार हडपसर कडून शेकडो गरजवंतांना कडाक्याच्या थंडीत मायेची ऊब

शहरात सध्या थंडीचा तडाखा वाढू लागला आहे त्यात कोरोना काळ असल्याने कोणी कोणाला स्पर्श करू नये अशी परिस्थिती असतानासुद्धा ज्यांच्या डोक्यावर हक्काचे छत नाही ‌व दिवसभर मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरून जिथे जागा मिळेल त्या फुटपाथवर अंग टाकणारे कोणाकडे तक्रार नाही याचना नाही देवाने दिले तसे रहायचे अशा गरीब लोकांच्या अंगावर मायेची ऊब देण्याचे काम कला परिवार हडपसरच्या कार्यकर्त्यांनी केले. ज्यांच्या अंगावर अनपेक्षित पणे ही ऊब मिळाली त्यांनी दिलेला आशीर्वाद पाहून कार्यकर्त्यांना ही कृतकृत्य झाल्यासारखे झाले. रात्रीच्या त्या निरव शांततेत हे कार्यकर्ते फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकत पुढे जात होते हडपसर ,स्वारगेट,रेल्वेस्टेशन,शनिवारवाडा या परिसरात वाटप करण्यात आले.
या उपक्रमाची संकल्पना योगेश गोंधळे व दिलीप मोरे सर यांची होती

कालीदिंडी प्रशांत,शीतल परमार,सनाह काचवाला, प्रतिभा पेटकर,अॅड. प्राजक्ता गिरमे यांच्या सौजन्याने हा उपक्रम कला परिवार हडपसर यांनी हाती घेतला होता .
या उपक्रमात डॉ .शंतनु जगदाळे, दिलीप मोरे, योगेश गोंधळे, डॉ अश्विनी शेंडे,प्रमोद अय्या,डॉ. गणेश शिंदे, यश भोरे, स्मिता गायकवाड, संगीताताई बोराटे,रुपाली वांबुरे,आकाश जाधव,काजल माने,वनिता गायकवाड, प्रिया हिंगणे,श्रुतिका क्षीरसागर, स्मिता मधुकर ,रौफ शेख सहभागी झाले होते

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of


0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x