दिल्ली

१४ डिसेंबरपासून चोवीस तास मिळणार RTGS सुविधा.

नवी दिल्ली : १४ डिसेंबरपासून बँकिंगशी निगडीत एका नियमामध्ये बदल होणार आहे. दरम्यान, या बदलणाऱ्या नियमाचा ग्राहकाना मोठा फायदाही होणार आहे. १४ तारखेपासून रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा २४ तास मिळणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसद्वारे ३६५ दिवस कोणत्याही वेळी पैसे पाठवता येणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यात RTGS ची सुविधा २४ तास करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला होता. ही सुविधा २४ तास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे २४७३६५ लार्ज व्हॅल्यू रिअल टाईम पेमेंट सिस्टम असलेल्या जगातील अवघ्या काही देशांच्या भारत सामील होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. सध्या RTGS ची सुविधा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सोडून कामकाजाच्या इतर दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात उपलब्ध आहे.

RTGS द्वारे त्वरित पैसे पाठवण्यास मदत होते. मोठी रक्कम पाठवण्यासाठी या सुविधेचा प्रामुख्यानं वापर केला जातो. निरनिराळ्या बँकांसाठी पैसे पाठवण्याची मर्यादा ही निरनिराळी आहे. यापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरशी (NEFT) निगडीत नियमांत बदल करण्यात आला होता. गेल्या वर्षापासून ग्राहकांसाठी २४७३६५ ही सुविधा उपलब्ध आहे. NEFT द्वारे पाठवण्यात येणाऱ्या पैशांना किमान मर्यादा नाही. तसंच कमाल मर्यादा ही निरनिराळ्या बँकांवर अवलंबून आहे.

* काय आहे RTGS चा फायदा

RTGS सुविधेद्वारे त्वरित मोठी रक्कम कोणत्याही व्यक्तीला पाठवणं शक्य आहे. RTGS सुविधेची कमाल मर्यादा ही प्रत्येक बँकेवर अवलंबून असते. ऑनलाइन किंवा बँकेच्या कोण्याही शाखेत जाऊन ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x