पुणे

पुणे विभागातील 5 लाख 50 हजार 823 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 73 हजार 755 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.14 :- पुणे विभागातील 5 लाख 50 हजार 823 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 73 हजार 755 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 98 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 834 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.76 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 70 हजार 913 रुग्णांपैकी 3 लाख 56 हजार 580 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 496 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 837 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.14 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 158 रुग्णांपैकी 52 हजार 778 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 590 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 124 रुग्णांपैकी 47 हजार 636 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 732 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 864 रुग्णांपैकी 45 हजार 897 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 228 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 696 रुग्णांपैकी 47 हजार 932 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 52 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 712 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 899 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 685 , सातारा जिल्ह्यात 71, सोलापूर जिल्ह्यात 106, सांगली जिल्ह्यात 30 तर कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 908 आहे. पुणे जिल्हयामध्ये 592, सातारा जिल्हयामध्ये 152, सोलापूर जिल्हयामध्ये 146, सांगली जिल्हयामध्ये 15 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 3 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 34 लाख 85 हजार 340 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 73 हजार 755 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 13 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x