पुणे (प्रतिनिधी)
“कोव्हीड 19” या आजारावर राज्यात अंकुश बसविला असून लसीकरण सुरू झाले आहे, टप्प्याटप्प्याने राज्य पूर्ववत होत असताना आध्यात्मिक सत्संग सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी स्पिरीचुअल सोशल अँड चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन द्वारे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
आपण राज्याची धुरा हाती घेतल्यापासून महाराष्ट्राचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
“कोव्हीड 19” प्रसार काळात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. त्यातच राज्यात आजपासून लसीकरण मोहीम सूरू करण्यात आली आहे.
धकाधकीच्या जीवनात प्रचंड तणाव वाढत असताना आध्यात्मिक सत्संग मुळे मनःशांती मिळते. दुःख विसरून लोक आनंदी राहतात, त्यामुळे सत्संगची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने देशात आध्यात्मिक सत्संग साठी 100 लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली आहे. राज्यात अद्याप यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात शाळाही सुरू होत आहेत. राज्यात आटोक्यात आलेली परिस्थिती पाहता काही अटी शर्थी घालून आध्यात्मिक सत्संग सुरू करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही. आम्ही आपण निर्धारित केलेल्या सर्व नियमांचे पालन करू याची ग्वाही देतो. अशी माहिती फाऊंडेशनचे राष्ट्रीय महासचिव अनिल मोरे यांनी दिली आहे.
निवेदनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात आध्यात्मिक सत्संग साठी परवानगी देण्यात यावी याकरिता संबंधित विभागांना व महापालिकांना आदेश अशी मागणी करण्यात आली आहे. या मेलची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली असून संबंधित निवेदन नगर विकास विभागास पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे म्हटले आहे.
धकाधकीच्या जीवनात आध्यात्मिक आधार महत्वाचा
रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचा ताणतणाव असतो मनःशांती साठी आध्यात्मिक सत्संग आवश्यक आहे, सत्संग मुळे चिंता दूर होऊन आरोग्य निरोगी राहते व सामाजिक सलोखा बनून राहतो याकरिता आध्यात्मिक सत्संग राज्यात नियमावली करून सुरू करण्यास परवानगी द्यावी.
अनिल मोरे
राष्ट्रीय महासचिव
स्पिरीचुअल सोशल अँड चॅरिटेबल फाऊंडेशन
Login Link Alternatif Omaslot