पुणे( 23)
थोर स्वातंत्र्यसेनानी भारताचे महान सुपुत्र सुभाचन्द्र बोस यांची जयंती एस. एम .जोशी कॉलेजमध्ये संपन्न झाली. ब्रिटिशांच्या विरोधात भारतीय स्वातंत्र्यासाठी जो सुभाषबाबूंनी लढा दिला तो ऐतिहासिक आहे, असे विचार डॉ. बाळासाहेब देवकाते यांनी मांडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. ते म्हणाले की, सुभाषचंद्र बोस हे महान देशभक्त होते. त्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले .या समारंभाला उपप्राचार्य डॉ.एम. एल. डोंगरे, डॉ. महादेव जरे, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. आभार डॉ. सुनंदा पिसाळ यांनी मानले.