पुणे

जुन्नर तालुक्यातील शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पासाठी जागा हस्तांतरण करण्याच्या मागणीचा प्रस्ताव – राज्यमंत्री आदिती तटकरे

पुणे – जुन्नर तालुक्यातील शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पासाठी जागा हस्तांतरण करण्याच्या मागणीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्याचे आदेश राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पर्यटन संचालकांना दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात शिवसृष्टी उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षे सातत्याने होत आहे. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पाचा आराखडा तयार केला. या प्रकल्पाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पार पडले होते. या शिवसंस्कार सृष्टीसाठी जागा निश्चित करुन प्रस्ताव तयार सादर केल्यास निधी उपलब्ध करून देण्याची तयारी उपमुख्यमंत्री पवार यांनी दर्शवली होती. त्याअनुषंगाने खासदार डॉ. कोल्हे व आमदार बेनके यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती.

या मागणीची तत्काळ दखल घेत पर्यटन राज्यमंत्री तटकरे यांनी गुरुवारी मंत्रालयात पर्यटन संचालक, एमटीडीसीचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आमदार अमोल मिटकरी, पर्यटन संचालक श्री. धनंजय सावरकर आदी उपस्थित होते.

या संदर्भात राज्यमंत्री तटकरे यांनी १ फेब्रुवारी रोजी पर्यटन विभाग व जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक बोलावली असून शिवसंस्कार सृष्टीसाठी वडज येथील एरिगेशन कॉलनीची जागा पर्यटन विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा होणार आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x