पुणे (प्रतिनिधी)
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी केलेल्या मागणीनुसार पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरचा तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला येथील उड्डाणपूल होण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक बोलवली होती.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने संरक्षण विभाग व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांची जागा संपादन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच या दोन्ही उड्डाणपुलांच्या उभारणीसाठी येत असलेल्या अडचणींवर चर्चा करून यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. या बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल तसेच संरक्षण विभागाचे अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी, पुणे मनपाचे मुख्य अभियंता बोनाला साहेब, नगरसेवक उमेश ज्ञानेश्वर गायकवाड
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
Real superb information can be found on web
blog.Raise your business