पुणे
नवीन शैक्षणिक धोरण मूल्यात्मक शिक्षणाला महत्त्व देते. संशोधनाला चालना देणारे आहे .कौशल्य विकासाला या नवीन शैक्षणिक धोरणाने गती प्राप्त होईल. भारताला विश्वगुरू होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आले आहे, असे असले तरी लोकशाही संस्कृती असलेल्या भारतात नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा व्हायला हवी होती ती झाली नाही. भारतीय घटनेतील सेक्युलॅरिझम या शब्दाला वगळण्यात आले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामुळे 35 हजार महाविद्यालये बंद होतील. अभ्यासक्रमात भारतीय स्वातंत्र्याचा लढा व भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक्रमात समावेश हवा. प्रादेशिक भाषेचे संवर्धन व्हायला हवे. समाजातील शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसेल असे नवीन शैक्षणिक धोरण हवे. असे विचार डॉ. भालबा विभूते कोल्हापूर यांनी मांडले. ते एस .एम .जोशी कॉलेजमध्ये ‘नवीन शैक्षणिक धोरण: सद्यस्थिती व अपेक्षा’ या विषयावर मराठी व इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. वैचारिक स्वातंत्र्यासाठी शिक्षण हवे. मानवी जीवनातील अंधार दूर करण्याचे माध्यम म्हणजे शिक्षण आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. पी.आय. भोसले यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. ए .यु. हिप्परकर यांनी केले. आभार डॉ. आर. के. ठाकरे यांनी मानले. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.