छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंती निमित्त हडपसर मध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून दरवर्षी प्रमाणे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला. तसेच “शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात…” या उपक्रमातून घरोघरी शिवजयंती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण ही करण्यात आले. तसेच ‘कोरोना योद्धा’ सन्मान सोहळा तसेच संघटनेचा पद नियुक्ती सोहळा करून याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा महासंघ चे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संभाजी ब्रिगेड चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, अठरा पगड जातीची छावाचे छावाप्रमुख धनंजय जाधव, बाबासाहेब शिंगोटे, सतीश जगताप, सविता अनिल मोरे, रोहिनीताई भोसले, हनुमंत मोठे, पवार सर, विवेक तुपे, चंद्रशेखर घाडगे, उत्तम कामठे, किशोर मोरे,विनोद परांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र कोंढरे यांनी तरुणांनी शिवविचार घेऊन पुढे जायला पाहिजे आणि प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे असे सांगितले. तर श्री. संतोष शिंदे म्हणाले… ‘शिवजयंती उत्सव राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला पाहिजे…’ छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन चालणार नाही तर सर्वांनी डोक्यात घेतले पाहिजेत. शिवचरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे. शिवजयंतीच्या निमित्ताने देशात समता-समानता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक प्रबोधनातून लोक जागर केला पाहिजे. ‘प्रबोधन’ हे लोकांना एकत्र करण्याचा हा चांगला मार्ग आहे. शिवचरित्र वाचून तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, कारण इतिहासातुन सर्वांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे असे शिंदे म्हणाले., धनंजय जाधव यांनी तरुणांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सरकारच्या वेगवेगळ्या महामंडळ चा निधी घेऊन व्यवसाय उभे केले पाहिजेत असे सांगितले.
यावेळी राज्यस्तरिय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला मा. रामकृष्ण आण्णा सातव यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, मा. डॉ.अभय जाधव यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज समाज गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, हभप. सौ. विद्याताई राजाराम जगताप महाराज यांना ‘राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ जिवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, मा. सतीश काळे यांना ‘राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, मा. महेश टेळे पाटील यांना ‘छत्रपती संभाजी महाराज शंभू गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, मा. धनाजी येळकर पाटील यांना ‘छत्रपती संभाजी महाराज मराठा भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, मा. अजित आबा घुले यांना ‘छत्रपती संभाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
तसेच यावेळी कोरोना महामारी मध्ये आपली जीवाची पर्वा न करता लोकांना घरोघरी गॅस सिलेंडर देण्याचे काम करणाऱ्या ‘गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांचा’ प्रमाणपत्र व प्रतिमा देऊन “कोरोना योद्धा सन्मान” करण्यात आला.
तसेच शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या चार विभागात सन्मान चिन्ह आणि शिवरायांच्या प्रतिमा असे प्रत्येकी तीन असे एकूण 12 बक्षिसे देण्यात आले.
तसेच संघटनेच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष मा. संदीप लहाने पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नामदेव निकम, शेखर पाटील, अक्षय भोसले, उल्हास तुपे, तुषार घुले, बबन वारे, अशोक देशमुख, राहुल खराडे, नवनाथ गुंजाळ, अमोल घाडगे, तात्या घिगे, अरुण सोले, दगडू नलवडे, यांनी प्रयत्न केले, आभार प्रदर्शन प्रदेश उपाध्यक्ष निलेश आण्णा काळे पाटील यांनी केले.सूत्रसंचालन महासचिव विशाल लहाने पाटील यांनी केले.