पुणे (27 )
विष्णू वामन शिरवाडकर हे महाराष्ट्राच्या मनामनात कोरले गेलेले साहित्यिक आहेत .ते मराठी भाषेतील कवी, लेखक, नाटककार म्हणून श्रेष्ठ आहेत. सामाजिक भान जपणारे त्यांचे काव्य आहे .असे विचार मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत बोलत होते. त्यांनी काव्यगायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले .मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ,नशीब, लिलाव या कवितांना रसिकांनी मनापासून दाद दिली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते .ते म्हणाले की, मराठी साहित्याची परंपरा सातशे वर्षांची आहे. गौरवशाली परंपरा असणारे मराठी साहित्य श्रेष्ठ आहे . मातृभाषेचे संवर्धन झाले पाहिजे .शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे. समाजात प्रबोधनाची अनेक माध्यमे आहेत, त्या माध्यमातून प्रबोधन केले पाहिजे. पैशापेक्षा प्रेमाचा ओलावा जपला पाहिजे . जीवनात निर्मितीचा क्षण माणसाला प्रेरणा देतो . काव्यनिर्मितीच्या प्रेरणा शोधल्या पाहिजेत.त्या प्रेरणांमुळे काही प्रतिभावंत मोठे झाले . प्रास्ताविक डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नम्रता मेस्त्री यांनी केले .आभार मराठी विभागाचे प्रमुख डॉ. पांडुरंग भोसले यांनी मानले. या ऑनलाईन कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे ,डॉ. एम. आर. जरे, सर्व प्राध्यापक विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.