पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
महादेवनगर मांजरी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश नलावडे यांनी महापालिकेत गाव घेऊन जाण्याचे फायदे नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी पत्रकाद्वारे प्रबोधन सुरू केले आहे. मांजरीच्या बुद्रुकचे शहरीकरण वाढत आहे. इतका मोठा परिसर आणि लोकसंख्या असल्याने यापुढे ग्रामपंचायत सुविधा व विकास कामांना न्याय देऊ शकत नाहीत.
या गावाला महापालिकेत समाविष्ट केल्यास, रस्ते, वीज, पाणी, कचरा, गटारे या सुविधांबरोबरच महानगरपालिकेतर्फे पुरविल्या जाणार्या शिक्षण आणि आरोग्य सुविधांनाही याचा फायदा होईल. हे आपल्याला गृहनिर्माण नोंदणीद्वारे आर्थिक विकासासाठी कर्ज मिळविण्यात मदत करेल आदी बाबींचा समावेश आहे. हे पत्रक गावातील नागरिकांना वाटप केले जात असून यामुळे पालिका प्रवेशाबाबत सकारात्मकता वाढविण्यात मदत होईल, असे नलावडे यांनी सांगितले.
महेश नलावडे यांनी पत्रकार राजकारण्यांचे वाभाडे काढले आहेत, 40 वर्ष राजकारणात जुने गेले नवे आले एवढाच बदल, टाक्या बांधल्या, पाईपलाईन आली पण नळांमध्ये पाणी आले नाही.
कचरा टाकायला जागा नाही, जागेचा वाद सुटेना, हडपसर गाडीतळ येथील मुतारीत 24 तास वाया जाणाऱ्या पाण्याने मांजरीचा पाण्याचा प्रश्न सुटेल.
भ्रष्ट राजकारण्यांमुळे विकास झाला नाही, नवे प्रकल्प नाहीत, नागरी सोयीसुविधा नाहीत, फक्त राजकारण करून ग्रामस्थांचे प्रश्न कोण सोडविणार असा सवाल त्यांनी या पत्रकात केला आहे.
गाव महापालिकेत गेले तर मोठमोठे प्रकल्प येतील पण राजकीय मोनोपल्ली संपेल अन आर्थिक गणित फसेल या भीतीने मात्र पालिकेत समावेश करण्यास विरोध केला जात आहे. लोकशाही मार्गाने आम्ही नागरिकांच्या जनआंदोलन करू अन मांजरी ग्रामपंचायत पालिकेत समावेश करण्यासाठी लढा देऊ असा इशारा महेश नलावडे यांनी दिला आहे.
मांजरी ग्रामपंचायत नको रे बाबा… “राजकीय स्वार्थ” बाजूला सारून गावे महापालिकेत घ्या अन्यथा लढा देणार : महेश नलावडे यांनी पत्रके वाटून केली जनजागृती
Subscribe
Login
0 Comments