पुणे ः प्रतिनिधी
महिलांनी सर्व क्षेत्रांत नेतृत्व, कर्तृत्व सिद्ध करत उत्तुंग भरारी घेतली आहे. अनेक समाजसुधारकांमुळेच महिलांची प्रगती होऊ शकली आहे, हे विसरून चालणार नाही. फक्त जागतिक महिला दिनी सन्मान नाही, तर दररोज महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असे मत मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रोहिणी काळे यांनी व्यक्त केले. मॉडर्न हायस्कुलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रामाचे आयोजन केले होते. यावेळी पर्यवेक्षिका नीलिमा कुमावत, सविता बोराटे, अर्चना सुरवसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
पर्यवेक्षिका नीलिमा कुमावत यांनी प्रास्ताविक केले. तृप्ती वाव्हळ यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती देवळे यांनी आभार मानले.
सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती कौतुकास्पद ः मुख्याध्यापिका काळे.
Subscribe
Login
0 Comments