पुणे ः प्रतिनिधी
एक दिवस महिला दिन साजरा करून चालणार नाही, तर दररोज महिलांना सन्मान दिला पाहिजे. या भूमिकेतून हडपसरमधील 100 डेन्टल क्लिनिकमध्ये एकाच दिवशी एक हजार हून अधिक महिलांची मोफत दंतचिकित्सा करून त्यांना भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला, असे इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेने अध्यक्ष डॉ. ओंकार हरिदास यांनी सांगितले.
डॉ. हरिदास म्हणाले की, महिला दिनाचे औचित्य साधून इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेच्या वतीने महिलांची मोफत दंतचिकित्सा करण्यात आली. असोसिएशनच्या 100 हुन अधिक डेंटल क्लीनिकने एकाच दिवशी आपापल्या क्लिनिकमध्ये हा उपक्रम राबविला. महिलांनी सहभागी व्हावे, यासाठी हडपसर परिसरामध्ये तीन दिवस अगोदर माहितीपत्रक देऊन गरजूंना आवाहन केले होते. आगळावेगळा महिला दिनी गरजूंना सेवा देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविले होते, त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात उत्तम यश मिळाले, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. रोहित गांधी आणि डॉ. अर्चना चव्हाण म्हणाल्या की, एकाच दिवशी 100 क्लिनिकमध्ये एक हजारहून अधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. डेंटल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. सौरभ वंडकर, डॉ. कुलथे, डॉ. आव्हाड, डॉ. अक्षय राऊत, डॉ. प्रतीक राऊत, डॉ. ममता ढवळे, डॉ. केदार केळकर, डॉ. सोनाली खेडकर, डॉ. भारती संत, डॉ. अपूर्व साहू, डॉ. श्रीराम क्षीरसागर, डॉ. नितीन सपाट, डॉ. भूमिका यांचे या उपक्रमासाठी मोठे योगदान लाभले.
सचिव डॉ. स्मिता झांजुणें यांनी सर्व व्यवस्थापन आणि खजिनदार डॉ. सौरभ बिर्ला यांनी कार्यक्रमचे नियोजन केले होते.
हडपसरमधील 100 डेंटल क्लिनिकमध्ये एक हजारहून अधिक महिलांची केली दंतचिकित्सा – डॉ. हरिदास
Subscribe
Login
0 Comments