पुणे ः प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांना महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवूनदेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेच्या अनेक योजना आहेत,त्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचेस्मार्ट कार्ड देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा परिसरातील सुमारे ४००नागरिकांनी लाभ घेतला असे मत माजी उपमहापौर निलेश मगर यांनी व्यक्त केले.
मगरपट्टा येथील कार्यालयात निलेशदादा मगर युवामंचच्या वतीने नगरसेविका हेमलता मगर यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांना ज्येष्ठनागरिक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
नगरसेविका हेमलता मगर म्हणाल्या की, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यातआले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे चारशेहून अधिक नागरिकांनी ज्येष्ठनागरिक आणि स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी सहभाग नोंदवला होता. त्यांना रविवारी (दि.४ एप्रिल) स्मार्ट आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनीकार्ड मिळाल्यानंतर समाधान व्यक्त केले.
दरम्यान, निलेश मगरम्हणाले की, अनेकांकडे जन्म तारखेचे दाखले नाहीत, जन्मतारखेचा कोणताच पुरावा नाही, त्यामुळे त्यांनाशासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे त्यांना ज्येष्ठ नागरिक कार्ड आणिएसटी मंहामंडळाचे स्मार्ट कार्ड मिळवून देण्यासाठी तहसील, ससूनरुग्णालय आणि एसटी अधिकाऱ्यांना बोलावून तीन दिवस परिसरातील नागरिकांची तपासणीकेली. त्यांना ज्येष्ठ नागरिक आणि स्मार्ट कार्ड देण्यासाठी २१ दिवसांचा कालावधीलागला. मात्र, आज दोन्ही कार्ड मिळाल्यानंतर त्यांच्याचेहऱ्यावरील हास्य पाहताना मनोमन समाधान वाटत होते, असेस्पष्ट केले.
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न ःनिलेश मगर
Subscribe
Login
0 Comments