पुणे

हडपसर मध्ये 100 ऑक्सिजन बेडला पालिका आयुक्तांची मंजुरी : खासदार, आमदार व नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

 

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
हडपसर परिसर कोरोना हॉटस्पॉट बनला असून ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे, हडपसर मध्ये महापालिकेचे ऑक्सिजन बेड मिळावेत यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून ऑक्सिजन बेडला पुणे महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
आमदार चेतन तुपे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून हडपसर मध्ये वाढत्या कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना हडपसर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे यामुळे हडपसर मधील सर्व रुग्णालये फुल्ल झाले असून ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत.
हडपसर मधील वाढती रुग्णांची संख्या व अपुऱ्या बेडमुळे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे गेले सहा महिने वारंवार पाठपुरावा केला की हडपसर मध्ये महापालिकेचे ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत, आयुक्तांनी ऑक्सीजन बेडला मंजुरी दिली असून मगरपट्टा येथील अण्णासाहेब मगर हॉस्पिटल व बनकर शाळेत ऑक्सीजन बेड लावण्यासंदर्भात प्रशासन लवकरच कार्यवाही करणार आहे.
हडपसर करांना ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत याकरिता खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेवक बंडूतात्या गायकवाड, योगेश ससाणे, नगरसेविका हेमलता मगर, पूजा कोद्रे, आनंद अलकुंटे, अशोक कांबळे यांनी महापालिका आयुक्तांकडे तगादा लावला होता की हडपसर मध्ये अण्णासाहेब मगर हॉस्पिटल व बनकर स्कूल येथे 100 बेड करावेत गेले अनेक दिवस केलेल्या पाठपुरावा केल्यामुळे अखेर आयुक्तांनी हडपसरमध्ये ऑक्सीजन बेडला मंजुरी दिली असून याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक व आमदारांनी केली आहे.
यासंदर्भात माहिती घेतली असता हडपसर मगरपट्टा चौकातील अण्णासाहेब मगर हॉस्पिटल व जवळील पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इमारतीमध्ये ऑक्सीजन बेड लावण्यात येणार असून उर्वरित बेड बनकर शाळेत गोंधळेनगर येथे लावावेत अशी मागणी नगरसेवकांची आहे.
हडपसर मध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत म्हणून व्हिजन हडपसर च्या माध्यमातून खासदार, आमदार व नगरसेवकांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली होती तसेच महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता या मागणीनुसार आमदार चेतन तुपे वास नगरसेवकांनी हडपसर मध्ये ऑक्सिजन बेडबाबत पाठपुरावा केला, महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्याबद्दल व्हिजन हडपसर च्या वतीने आभार मानण्यात आले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x