हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
सध्या कोरोनाचे संकटाने सर्व हवालदिल झाले आहेत. यावर व्हॅक्सिनेशन हाच एक मोठा इलाज असल्याने व्हॅक्सिनेशनसाठी सर्वांची धावपळ होते आणि आपण ठरवलेल्या केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. तर काही ठिकाणी वादविवाद निर्माण होत आहेत. यामुळे प्रशासन आणि आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी अशी मागणी हडपसर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुधीर मेथेकर यांनी महापौर व पालिका आयुक्तांकडे केली आहे.
सोशल मीडिया द्वारे आवाहन करत सुधीर मेथेकर म्हणतात, लसीकरण केंद्रावर गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी एक जेष्ठ नागरिक म्हणून असे सुचवायचे आहे की मुंबई प्रमाणे पुणे येथे सुध्दा सोसायटी मध्येच व्हॅक्सिनेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
जेणेकरून केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यास मदत होईल आणि कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मदत होईल.
ऑनलाईन नोंदणी मध्ये सावळा गोंधळ
ऑनलाईन लस साठी नोंदणी करतांना रात्री आठची वेळ सांगीतली जाते परंतू त्याआधीच अपडेट टाकले जातात आणि आपण लाॅगइन केल्यावर सर्व बुक झालेले असते. अशा वेळी नागरिकांनी काय करावे? नोंदणी नाही, लसीकरण केंद्रावर गर्दी यामुळे जेष्ठ नागरिक हवालदिल झाले आहेत, महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे श्री.मेथेकर यांनी म्हटले आहे.
“लस घेण्यासाठी नागरिकांना करावी लागते वणवण” लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी – सुधीर मेथेकर
Subscribe
Login
0 Comments