हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
आज आमदार चेतन तुपे आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी हडपसर येथील अण्णासाहेब मगर हॉस्पिटल ची पाहणी केली.
हडपसर वासीयांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे यासाठी नवीन बांधण्यात येणाऱ्या हॉस्पिटलचे प्लॅन आमदार चेतन तुपे यांनी अतिरिक्त आयुक्तांना दाखवले त्याचप्रमाणे हे काम त्वरित चालू करावे त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची तय्यारी दर्शवली. हे हॉस्पिटल बांधकाम दोन टप्प्यात बांधावे म्हणजे आत्ता जे हॉस्पिटल चालू आहे त्याठिकाणी कोविड रुग्णांची सोय करता येईल व मोकळ्या जागेत फेज वन हॉस्पिटलची इमारत बांधून पूर्ण झाल्यावर जुन्या जागेतील हॉस्पिटल ते स्थलांतर करता येईल व फेस 2 चे काम त्याठिकाणी करता येईल असे सुचवले या आमदारांच्या प्रस्तावास सर्वांनी मान्यता देऊन हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती सर्व मंजुऱ्या देऊ असा शब्द रुबल अग्रवाल मॅडम यांनी दिला.
तसेच आमदार चेतन तुपे यांनी त्यांच्या निधीतून 46 लाख रुपये येथे चालू करण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटल साठी देण्याचे मान्य केले त्यातून या कोविड हॉस्पिटलला लागणारे साहित्य लहान मुलांसाठी लागणारे व्हेंटिलेटर ICU साठी लागणारे साहित्य याची पण खरेदी त्वरित करावी असेच सूचना आमदार चेतन पाटील यांनी केल्या.
याप्रसंगी माजी उपमहापौर निलेश दादा मगर हे सुद्धा उपस्थित होते. तसेच भवन विभागाचे राउत साहेब, लंके साहेब, आरोग्य विभागाचे डॉक्टर वावरे, डॉक्टर साबने मॅडम, डॉक्टर बेंडे, डॉक्टर स्नेहल काळे, व इतर बांधकाम विभागाचे तसेच हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.