पुणे ः कोरोना लसीकरणासाठी विविध केंद्रांवर जाणाऱ्या नागरीकांचा डेटा बेकायदेशीररीत्या मिळवून, त्याद्वारे संबंधित नागरीकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर केंद्राचे सर्टिफीकेट व नगरसेवक स्वतःचा प्रचार करणारे सर्टिफीकेट नागरीकांना पाठवित आहेत. भाजपचे नगरसेवक बापु कर्णे गुरूजी व त्यांच्या मुलाने हा प्रकार केला आहे. त्यांना हा डेटा कोणी पुरविला याची चौकशी करून कर्णे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबतचे पत्र पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्ता भाग्यश्री नवटके यांना दिले.
पुण्यासह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण होत आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या नागरीकांची केंद्र सरकारच्या कोविन ऍपमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी केली जाते. त्यामुळे नागरीकांच्यादृष्टीने महत्वाचा असणारा हा गोपनीय डेटा हा केंद्र सरकार व महापालिका प्रशासनाने सुरक्षित पद्धतीने जतन करणे आवश्यक आहे. हा डेटा कोणत्याही राजकीय पक्षाला, व्यावसायिक आस्थापनांना देता येत नाही. असे असतानाही शहरात विविध केंद्रांवर लसीकरण झालेल्या नागरीकांचा डेटा हा काही नगरसेवकांनी बेकायदेशीररीत्या मिळविला असल्याचे जगताप यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
नगरसेवकांनी मिळविलेल्या डेटापैकी नागरीकांच्या मोबाईल क्रमांकावर केंद्र सरकारचे सर्टिफीकेट व नगरसेवक स्वतःचा प्रचार करणारे सर्टिफीकेट नागरीकांना पाठवित आहेत. या डेटामध्ये नागरीकांची वैयक्तीक, खासगी, व्यावसायिक (मालमत्ते विषयक) माहिती जोडलेली असण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे नागरीकांचे व्यक्तीमत्व स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे. हा प्रकार गोपनीय कायद्याचा भंग आहे. येरवडा परिसरातील भाजपचे नगरसेवक बापु कर्णे व त्यांचा मुलगा उदय कर्णे यांनी या पद्धतीने नागरीकांचो डेटा मिळवून त्यांना व्हाटस्अप व मेसेजद्वारे सर्टिफीकेट पाठवित आहेत. कर्णे यांना हा डेटा कोणी दिला, याच पद्धतीने अन्य लोकांना हा डेटा कोणी दिला,याची सखोल चौकशी करावी. तसेच या प्रकरणी बापु कर्णे व उदय कर्णे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
लसीकरण झालेल्या नागरिकांचा डेटा : भाजपच्या नगरसेवकांकडे भाजप नगरसेवकांवर गुन्हा दाखल करा : प्रशांत जगताप
Subscribe
Login
0 Comments