हड़पसर (प्रतिनिधि)
आजारामुळे अंथरुणाला खिळलेले ( बेड रिडेन) व गंभीर अपंग नागरिकांना घरी जावून कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकड़े अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाला मात देण्याची सर्व तयारी सूरू आहे. अनेक ठिकाणी अडखळत का होईना लसीकरण सूरू आहे परंतु आजारामुळे अंथरुणाला खिळलेले ( बेड रिडेन) व गंभीर अपंग असणाऱ्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर घेवून जावून लस देणे त्यांच्या परिवाराला अशक्यप्राय असेच आहे. परंतु त्यांचे ही लसीकरण होणे आवश्यक आहे. तरी शासनाने अशा नागरिकांकडे दुर्लक्ष न करता आरोग्य मंञालयाने अध्यादेश काढून आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत अशा नागरिकांचे त्यांच्या घरी जावून लसीकरण करावे व यात तत्परता दाखवावी. तसेच अशा नागरीकांची नावनोंदणी करण्यासाठी COVIN APP मध्ये तसे tab कार्यान्वित करावे व घरी जावून लस द्यावी अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व आरोग्य मंञी राजेशजी टोपे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.