पुणे : – बिबवेवाडी-कोंढवा (Bibwewadi-Kondhwa) रस्त्यावरील सूर्यप्रभा गार्डन (Suryaprabha Garden) परिसरात वीज केबल भूमिगत (Power cable underground) करण्याचे काम सुरु आहे. या कामाची तरतूद मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात (Budget) करण्यात आली होती. या कामाचे 90 टक्के पैसे ठेकेदाराला (Contractor) देण्यात आले. परंतु आता काम सुरु झाल्याचा अजब कारभार उघडकीस आला आहे.
पालिकेच्या आदेशाला केराची टोपली
भूमिगत वीज केबल करण्याच्या कामाची वर्क ऑर्डर (Work order) 19 मार्च 2020 रोजी देण्यात आली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. 19 मे रोजी काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु त्यानंतरही सध्या या ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करुन केबल टाण्याचे काम सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेने 24 तास पाणीपुरवठा (Water supply) योजनेव्यतिरिक्त सर्व खोदईची कामे 31 मे रोजी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना हे काम सुरु असल्याचे समोर आले आहे.
कोरोनामुळे कामाला विलंब
यासंदर्भात पालिकेने कोरोनामुळे कामाला विलंब झाल्याचा खुलासा केला आहे. तसेच पथ विभागाकडे खोदाई करण्याबाबत परवानगी मागण्यात आली आहे. या कामासाठी मटेरियल खरेदीसाठी ठेकेदाराला 90 टक्के अॅडव्हान्स रक्कम आदा करण्यात आली आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पथ विभागाकडून खोदाईची कामे स्थगित
पालिकेने ठेकेदाराची बाजू घेत पथ विभागाकडे खोदाई संदर्भात परवानगी मागितल्याचे सांगितले.
परंतु पथ विभागाने पावसाळा सुरु होत असल्याने शहरातील खोदाईची कामे स्थगित करण्यात आली आहेत, असे सांगितले आहे.
त्यामुळे पालिकेच्या या अजब कारभाराची चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
अधिकारी, ठेकेदारावर कारवाई करणार
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील पाणी पुरवठा आणि अत्यावश्यक कामे वगळता सर्व खोदाईची कामे 31 मे रोजी थांबवण्यात आली आहेत. शहरामध्ये ज्या ठिकाणी खोदाईची कामे करण्यात आली आहेत, त्या ठिकाणी सध्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. यानंतर देखील कोठे खोदाई करण्यात येत असेल तर संबंधित अधिकारी आणि ठकेदारावर कारवाई केली जईल, असे डॉ.खेमनार यांनी सांगितले.