पुणे – सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम राबवून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक जाणीवच व्यक्त केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि पुणे जिल्हा घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी केले.
नागरिकांच्या सोयीसाठी काँग्रेस पक्षाने छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला असून उपक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या हस्ते काँग्रेस भवनात आज (सोमवारी) करण्यात आले. पहिल्याच दिवशी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
काँग्रेस पक्षाचा हा उपक्रम सामान्य नागरिकांसाठी हाती घेण्यात आलेला आहे. दिनांक १९ जून पर्यंत सकाळी ११ ते सहा या वेळात छत्र्या मोफत दुरुस्त करुन देण्यात येतील. या उपक्रमांद्वारे लोकांची सोय होईल, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले. सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक गंडांतर आले. त्यांनाही हातभार लावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे असेही जोशी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, मनीष आनंद, वीरेंद्र किराड, शेखर कपोते, कैलास कदम, युवक कार्याध्यक्ष राहुल शिरसाट, सचिन आडेकर, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, किशोर मारणे, स्वाती शिंदे, तिलेश मोता, नागेश भालेराव, अनिल अहिरे, चंद्रकांत चव्हाण, दिपक ओव्हाळ, मनोहर गाडेकर, अजित जाधव, अविनाश अडसुळ, बबलु कोळी, दुर्गा शुक्रे पाटील, नलिनी दोरगे, कांता ढोणे आदी उपस्थित होते.
https://fb.watch/66_bpNLI4O/