हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो मार्गाचा लोणी काळभोर पर्यंत विस्तार करावा तसेच स्वारगेट ते हडपसर असा मेट्रो मार्ग करण्याची मागणी गतवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे पाटील यांनी केली होती. या मागणीला यश आले असून आता मेट्रो मार्ग पुणे ते लोणी काळभोर व सासवडपर्यंत होणार आहे.
आता नव्याने या मार्गांना जोडून स्वारगेट ते सासवड मेट्रो या मार्गाला देखील मंजुरी मिळाली आहे मेट्रो हडपसर मधून सासवडपर्यंत नेण्यात यावी या संदर्भातही अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा मागील वर्षी केला होता असा दावा आमदार चेतन तुपे पाटील यांनी केला आहे.
तर या दोन्ही मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे या मेट्रो संदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता असे आमदार तुपे यांनी सांगितले
वचननाम्यात दिलेल्या वचनानुसार वचनपूर्ती च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे हडपसर भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या देखील यामुळे सुटणार आहे डीपीआर तयार केल्यानंतर मेट्रोच्या कामाला गती मिळणार आहे मेट्रो उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पार पडला असून हडपसरच्या विकासात मेट्रोचे महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे, या मेट्रोच्या कामांसाठी केंद्र व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहे.
चेतन तुपे पाटील
आमदार हडपसर विधानसभा मतदारसंघ