हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
हडसरच्या पोलिसांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने पाठलाग करून लाल रंगाची स्कार्पियो ताब्यात घेतली, तब्बल 650 लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह चालकास हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
या कारवाईत तीन लाख 57 हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हडपसर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसरचे कर्मचारी पोलीस शिपाई सागर दळवी व पोलीस शिपाई प्रमोद मोहरे यांना मिळालेल्या बातमीनुसार सोलापूर रस्त्यावर 15 नंबर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस निरीक्षक विकास राऊत पोलीस शिपाई दादा जरांडे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते, पोलीस शिपाई रशीद शेख यांनी ट्रॅप लावला होता, सोलापूर रोडवर येणाऱ्या वाहनांची टेहळणी करत असताना साधारण रात्री 11 च्या सुमारास एक लाल रंगाची स्कार्पिओ गाडी सोलापूर रोड वरून पुण्याच्या दिशेने येताना दिसली गाडीला थांबवण्याचा इशारा केला असता चालकांने गाडीसह धूम ठोकली, पोलीस पथकाने लाल स्कार्पिओ चा पाठलाग करून रवी दर्शन चौक येथे त्यास ताब्यात घेतले, त्याला माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली गाडीची तपासणी केली असता 35 लिटरचे काळे व हिरव्या रंगाची भरलेला दिसून आले गाडी मध्ये खेळांची झाकण उघडून पाहिले असता गाडीमध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्रीकरता घेऊन जात असल्याचे समजले त्यानुसार शिवाजी मधुकर तरंगे वय 40 वर्षे धंदा रा. दत्तवाडी, भावरापुर रोड व्यंकटेश नगर, उरुळी कांचन यास ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून सुमारे 19 गावठी हातभट्टीची दारूची कॅन्ड, स्कार्पिओ असा मिळून तीन लाख 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, विकास राऊत, पोलीस शिपाई सागर दळवी, प्रमोद मोहरे, दादा जरांडे, ज्ञानेश्वर चित्ते व रशीद शेख यांनी केली आहे.
तब्बल साडे सहाशे लिटर गावठी हातभट्टीची दारू अवैधरित्या स्कार्पियो मधून वाहतूक करणाऱ्यास हडपसर पोलिसांनी केले जेरबंद
Subscribe
Login
0 Comments