पुणे

मांजरी बुद्रुक- शेवाळेवाडी बस डेपोत इलेक्ट्रिक बसेससाठी ‘चार्जिंग स्टेशन’ आमदार चेतन तुपे यांनी केली पहाणी ; खासगी ई वाहनेही अर्ध्या तासात होणार चार्ज

हडपसर
हडपसर व परिसरातील प्रदूषणात घट करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी हडपसर भागात इलेक्ट्रिक बसेस जास्त प्रमाणात धावल्या जाव्यात त्यासाठी मांजरी बुद्रुक- शेवाळेवाडी येथील पीएमपीएमएलच्या बस डेपोत इलेक्ट्रिक बसेससाठी ‘चार्जिंग स्टेशन ‘ उभारण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रिक बसेस बरोबरच खासगी ई वाहनांनाही याठिकाणी चार्जिंग करता येईल,असे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार चेतन तुपे पाटील यांनी दिली.
सध्या शहर आणि उपनगरात इलेक्ट्रिक बसेस सुरू आहेत. लवकरच त्यांची संख्या वाढणार आहे. त्यातील अधिकाधिक बसेस या हडपसरच्या रस्त्यावर धावल्या जाव्यात जेणेकरून प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल. तेव्हा बसेस केवळ अर्ध्या तासात चार्जिंग कसा करता येतील यासाठी अद्यायावत असे इलेक्ट्रिक बसेससाठी ‘चार्जिंग स्टेशन’ शेवाळेवाडी येथील डेपोत उभारण्याचे नियोजन असून त्यासाठी सोमवारी आमदार चेतन तुपे यांनी पीएमपीएमएलचे आणि विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांच्या समवेत पाहाणी केली.ई बस येथे प्रवासी घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी येतील त्या मधल्या केवळ अर्धा तास एवढ्या वेळात बस पूर्ण चार्जिंग होइल,असे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. याशिवाय खासगी वाहनांनाही येथे आपले ई वाहन चार्जिंग करता येईल का असेही नियोजन करण्यात येत आहे. पालकमंत्री अजित पवार आणि आपल्या आमदार निधीतून हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार तुपे यांनी सांगितले.

याप्रसंगी महावितरणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सतीश राजदेव, सोमनाथ वाघोळे, पीएमपीएमएलचे विद्युत अभियंता प्रशांत भोडेकर, निलेशदादा घुले, विक्रम शेवाळे, बालाजी अंकुशराव, मंगेश मोरे, योगेश घुले, सरपंच अशोक शिंदे, किरण बहिरट, अनिल गुंडाले आदींसह शिवचैतन्य कॉलनी येथील ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.

ई-बस चार्जिंगची व्यवस्था भेकराईनगर डेपोत आहे. मात्र ती तोकडी आहे. भविष्यात आणखी ई- बस दाखल होणार असल्यामुळे चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमपीने पुढाकार घेतला आहे. अशी कल्पना पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी आपणांस दिली होती, याशिवाय पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांनीही शेवाळेवाडी- मांजरी बुद्रुक येथील बस डेपोत चार्जिंग स्टेशन उभारण्यात यावे यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार आज अधिकारी यांच्या समवेत पाहाणी केली आहे.लवकरच निधी उपलब्ध करून याठिकाणी चार्जिंग स्टेशनचा एक पथदर्शी प्रकल्प पीएमपीच्या बसेस बरोबरच खासगी ई वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे.
चेतन तुपे पाटील
आमदार, हडपसर विधानसभा.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x