हडपसर-काळेपडळ रेल्वे क्रॉसिंगजवळील भुयारी मार्गामध्ये रिक्षा प्रवाशांना कोयत्याच्या धाकाने लुबाडणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, कोयता हस्तगत केला असून, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शादाब युसूफ अन्सारी (वय १९, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि फैयाज अन्सारी (रा. आदर्शनगर, उरुळी देवाची, ता. हवेली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, काळेपडळ येथील रिक्षातील प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींची माहिती पोलीस अंमलदार भोईर यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून वर्णन आणि संशय़ावरून आरोपीला पकडले. आरोपी शादाब युसूफ अन्सारी आणि त्याचा साथीदार फैय्याज अन्सारी याच्याकडून दोन मोबाईल, कोयता असा एकूण तीस हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून, पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
सहायक पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या सूचनेनुसार वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस फौजदार संतोष तानवडे, पोलीस हवालदार अमजद पठाण, पोलीस हवालदार संजय बागल, राजीव रासगे, संतोष नाईक, संभाजी देवीकर, अतुल गायकवाड, सागर जगदाळे, अमित चिव्हे, गणेश खरात, दीपक भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
hipertrikoz sendromu
Altın Hediye Almak Ne Demek?