पुणे : प्रतिनिधी
शिक्षण हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे. शिक्षण घेणारा विद्यार्थी हाच इंडस्ट्रीचा ग्राहक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन दृष्टी प्राप्त व्हायला हवी. विकासात्मक दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. युवकांजवळ जर कौशल्ये असतील, तर त्यांना संधी प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्याने महाविद्यालयातून बाहेर पडताना पदवीबरोबर इतर कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. विद्यार्थी उद्योजक बनावा यासाठी इंडस्ट्रि अॅकडेमिया मिट यासारखे उपक्रम उपयुक्त ठरतात, असे मत प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले.रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सीआयआयआय आणि कॉमर्स विभागाच्या वतीने इंडस्ट्री अॅकेडेमिया मिट या ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये विविध उद्योजक, प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक अभ्यासक्रमातील तज्ज्ञ, एनजीओ व विद्यार्थ्यांबरोबर उद्योजक, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक सर्वांनी सहभाग घेतला. यावेळी चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व रोजगारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनला पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर कौशल्याचे धडे ही दिले गेले पाहिजेत, तर विद्यार्थी जीवनात यशस्वी होईल, अशी चर्चा झाली. दरम्यान, उपप्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. एम. आर. जरे यांनी महाविद्यालयाची माहिती सांगितली.डॉ. शकुंतला सावंत, प्रा. अर्जुन भागवत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आनंद हिप्परकर यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन दृष्टी प्राप्त व्हावी – डॉ. चंद्रकांत खिलारे
Subscribe
Login
0 Comments