स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम घ्यावे लागतील तरच यश मिळेल .ग्रंथांचे वाचन करा .इंटरनेटचा वापर ज्ञानसाधना वाढवण्यासाठी करा. आपले संवाद कौशल्य विकसित करा. आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांची चरित्रे वाचा. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी ध्येयवाद हा सुरुवातीपासूनच असायला हवा. अपयशातच यश दडलेले असते. वाचन, मनन, चिंतन करा .प्रशासकीय सेवेत ज्यांना जायचे आहे त्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे. सकारात्मक दृष्टी ठेवा. व्यक्तिमत्व विकासासाठी अशी शिबिरे उपयुक्त ठरतात, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी यांनी मांडले ,ते एस .एम. जोशी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी दहा दिवसीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होते. प्रास्ताविक व स्वागत परिचय एस. एम .जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.शकुंतला सावंत यांनी केले .आभार डॉ. अर्जुन भागवत यांनी मानले. या ऑनलाइन समारंभाला सर्व विद्यार्थिनी ,विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक सहभागी झाले होते.
कठोर परिश्रम केल्यावर यश मिळते – प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर सचिव, रयत शिक्षण संस्था
Subscribe
Login
0 Comments