हड़पसर, (प्रतिनिधि)
आपले सरकार या महाराष्ट्राच्या वेब साईट वर तक्रार, निवेदन व माहिती अधिकार यावर अनेक महिने काहीच कारवाई होत नसल्याची तक्रार अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
कोरोनाच्या दिवसात सर्व कार्यालयात ऑनलाईन कामे करण्यावर भर असताना नागरिकांच्या सोयीसाठी व तक्रार निवारणासाठी शासनाने सूरू केलेल्या अतिशय चांगल्या “आपले सरकार ” ऑनलाईन पोर्टलकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामूळे नागरिकांची दप्तरातील कामे अनेक महिने होत नाहीत. त्यामूळे महाराष्ट्र सरकारने तक्रार नोंदणी व माहिती अधिकाराची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी आपले सरकार ही साईट नागरीकांसाठी सूरू करण्यात आलेली आहे. त्यामूळे नागरिकांना हक्काने तक्रार नोंदविता येत होती व संबंधित कार्यालय तात्काळ पावले उचलत होत परंतु सध्या आपले सरकार वरील तक्रार, निवेदने व माहितीचा अधिकार अंतिम घटीका मोजत आहेत. तक्रार व निवेदन दाखल तर होते परंतु त्यावर महिनो महिने काहीच कारवाई होत नाही तर ऑन लाइन माहिती अधिकाराखाली माहिती मागविल्यास त्यात त्रुटी येते व संबंधित कार्यालयास ती माहिती चा अर्ज दाखल होत नाही कारण देय द्या मार्ग अडचण ( Payment Get way problem )दाखवते त्यामूळे संबंधित कार्यालय नागरिकांना हेलपाटे मारावयास लावत आहेत.तरी यात तात्काळ दुरूस्ती करून नागरीकांची गैरसोय दूर करावी व नागरीकांची सोय करावी. असे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.