पुणे (प्रतिनिधी)
पावसाने उघडीप दिल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने शेतकऱ्यांनी आमदारांकडे व्यथा मांडली, आमदारांनी तातडीने याची दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने छोट्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला, शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कार्यवाही झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंढवा जॅकवेलचे पाणी गेल्या वीस दिवसांन पासुन बंद असल्याने अन्सारी फाटा मांजरी, शेवाळवाडी, फुरसुंगी, लोणी मधील शेतकऱ्यांची पिके करपु लागली होती. त्यातच गेल्या 15 दिवसांपासून पावसाने ही ओढ दिलेली असल्याने आणि भयंकर चटक पडु लागल्याने पीकांना फटका बसु लागला होता, या परिसरातील शेतकरी हवालदिल झाले होते. वारंवार अधिकारी वर्गाशी पाणी सोडण्यासाठी विनंती करुनही चालढकल केली जात होती. अखेर अन्सारी फाट्याचे दिपक गदादे, बाळासाहेब भिसे, नाना काळे यांनी आमदार चेतन तुपे पाटील यांच्याशी संपर्क साधुन ही माहिती दिली. आमदारांनी तात्काळ संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करुन तातडीने पाणी सोडण्यास सांगितले. त्यामुळे संपुर्ण पुर्व हवेलीच्या शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे.
“शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकासआघाडी सरकार”
राज्यात महाविकासआघाडी सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत, हडपसरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांशी चर्चा केली व पाणी सोडले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाचणार आहेत.
चेतन तुपे पाटील
आमदार – हडपसर विधानसभा