पुणे ः प्रतिनिधी
हडपसरमध्ये (डीएसके विश्व, सायकरवस्ती) पडिक इमारतीमध्ये २ व्यक्तींवर किरकोळ कारणातून कोयत्याने वार (कोथळा) करून जीवे मारण्याचा प्रयत्न (२६ जून २०२१) करणाऱ्या चौघांना जेरबंद केले असून, विधिसंघर्षित बालकाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. संतोष गायकवाड आणि संतोष खेडकर यांनी फिर्याद दिली होती.
अमन चाँद शेख (वय 19), साजीद चाँद शेख (वय 22, रा. दोघे रा. धर्मवीर संभाजी चौक, माळवाडी, हडपसर, पुणे), आकाश गोविंद शेंडगे (वय 21, रा. कुंजीरवस्ती, गणपती मंदिरासमोर, मांजरी बुद्रुक, हडपसर, पुणे), प्रतिक विजय माने (वय 20, रा. रोहित वडेवालेचे पाठीमागे, मांजरी फार्म, पुणे) यांना अटक केली असून, विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्ह्राचे गांभीर्य ओळखून तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डी.एस.के इमातरी परिसरात ये-जा करणाऱ्यांची माहिती घेऊन तपास सुरू केला. दरम्यान, मांजरी परिसरात तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अकबर शेख व शाहीद शेख यांना सूत्रांकडून आरोपींविषयी माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, प्रदीप सोनवणे, समीर पांडुळे यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊनची चौकशी केली. त्यावेळी आरोपी अमन चाँद शेख याने सांगितले की, फिर्यादी संतोष गायकवाड याचा मित्र गोट्या याने आरोपीच्या मित्राला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून फिर्यादी व त्याचा मित्र संतोष खेडकर यांच्यावर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने वार केल्याची कबुली दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास राऊत करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, दिगबंर शिंदे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.