पुणे ः प्रतिनिधी
चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीचे वाद विकोपाला गेले. त्यातून पतीने चिडून पत्नीचा कांदा कापण्याच्या सूऱ्याने गळा कापून खून केला. हा प्रकार हडपसर बंटर बर्नाड स्कूलजवळ आज (शनिवार, दि. १० जुलै) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. या प्रकरामुळे हडपसरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतीला पोलिसांनी सांगितले.
अंजली नितीन निकम (वय २२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती नितीन निकम (दोघेही रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ गाव दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
हडपसारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार अंजली आणि नितीन यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना ४ वर्षांचा मुलगा आहे. नितीन भोसरीतील फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करतो. पत्नी अंजलीचा बाहेरख्यालीपणा नितीनला मानसिक त्रासदायक ठरत होता. वारंवार समजावूनही तिच्यामध्ये काही बदल होत नव्हता. प्रत्येक वेळी माफी मागून तिचे प्रकार सुरूच होते. त्यातून वादावादी झाली, मयत अंजलीची आई गोसावीवस्ती हडपसर येथे राहते. तेथे दोघे आले होते. तेथून ते दहीगाव येथे जाणार होते. मात्र, तिने गावाकडे जाण्यास नकार देत मुलगा नको, मी माझ्या प्रियकराकडे राहणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, नितीनने मुलाला मोठ्या भावाबरोबर गावाकडे पाठविले. मुलगा गावाकडे जाण्यास तयार नाही, आपण मुलाला घेऊन येऊ असे सांगून दुचाकीवर मुलाला आणण्यासाठी तिच्या बहिणीकडे हडपसरमध्ये दुचाकीवरून आले. मात्र, बंटर स्कूलच्या पाठीमागे दुचाकी उभी करून लघुशंका करतो असे सांगून बाजूला गेला. त्यावेळी तिला दुचाकी धरण्यास सांगून पाठीमागून जाऊन चाकूने गळा चिरून खून केला. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.