पुणे : एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेवर शारिरीक आणि मानसिक छळ करण्याचा सल्ला दिल्याने एका मोठ्या राजकीय गुरूला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा बडा राजकीय गुरु गजाआड गेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. रघुनाथ येमुल असे अटक करण्यात आलेल्या या राजकीय गुरुचे नाव आहे. येमुल याला अटकेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. (big politicians guru arrest in Pune, crowd of devotees in lockup, excitement in the political arena)
कोण आहे रघुनाथ येमिल ?
रघुनाथ येमुल पुण्यासह देशभरातील प्रशासकीय आणि राजकीय मंडळींचा गुरू आहे. पुण्यातील उच्चभ्रू गायकवाड कुटुंबातील एक वाद पोलिसांत आला होता. त्यानुसार पोलिस तपास करत असताना रघुनाथ येमुलबाबत धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. राजकीय क्षेत्रातील गणेश गायकवाड यांच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत शारिरीक आणि मानसिक अत्याचार करण्याबरोबर अमानुष मारहाण केल्याची तक्रार चतुःशृंगी पोलिस ठाण्यात केली होती. त्यावरून गायकवाड कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता.
संसार मोडण्यासाठी अघोरी कृत्याचा वापर
या प्रकरणाचा तपास सुरू असताना राजकीय गुरू येमुलचं कनेक्शन समोर आले. येमुल याने गायकवाड कुटुंबाला तुमची सून अवदसा असून पांढर्या पाय गुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, मी देतो ते लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल, असे पिडितेचा पती गणेशला सांगितले. त्यानंतर पती गणेश याने आपल्या पत्नीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला. यामुळे संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याच्या कारणावरून येमुल गुरूजीस अटक करण्यात आलीय.
अंनिसकडून कारवाईची मागणी
येमुल गुरूजीचे राजकीयपासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांशी नजीकचे संबंध आहेत. आपला हात पाहण्यासाठी अनेकजण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे संबंधीत प्रकरणात गुरूजीला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूजीला अटक केल्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे त्याचे भक्त त्याला भेटण्याचा प्रयत्नही करीत होते. त्यामुळे या प्रकरणात अंनिसने उडी घेतली असून कारवाईची मागणी केली आहे.
अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे पोलिसांचे आवाहन
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी येमुलला अटक केली असली तरी यासोबतच आणखी बडे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांविरोधात पुणे येथे पोलिसांनी कंबर कसली असून अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि बळी पडला असेल तर पोलिसांना कळवा त्यावर कारवाई करू असं आवाहन केलंय.
कोण आहे गणेश नानासाहेब गायकवाड
गणेश नानासाहेब गायकवाड हा पुण्याच्या औंध परिसरात राहतो. प्रसिद्ध उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे. औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत. गणेश गायकवाड यांची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. (big politicians guru arrest in Pune, crowd of devotees in lockup, excitement in the political arena)
hello there and thank you for your info – I have certainly
picked up something new from right here. I did however expertise several technical points using this
site, as I experienced to reload the website many times previous to I could get it
to load properly. I had been wondering if your
web hosting is OK? Not that I’m complaining, but slow loading instances times will sometimes affect your placement in google and could damage your quality score if ads and marketing with Adwords.
Well I am adding this RSS to my e-mail and could look out for a lot more
of your respective intriguing content. Make sure you update this again very soon..
Najlepsze escape roomy
Pretty! This has been an incredibly wonderful post. Thanks
for supplying these details.
Very great information can be found on web site. Euro trip