▪ पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय
▪ पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये 55 लाखांचा टप्पा पार केला ही समाधानाची बाब
▪ उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा
▪ पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरासह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा
पुणे, दि.23 : कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले.
पुणे विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार शरद रणपिसे, आमदार राहुल कुल, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. दिलीप कदम, आदि मान्यवरांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदींसह उपचार सुविधांचा सातत्याने आढावा घेण्यात यावा, तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेली धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहीम अधीक गतीमान करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये 55 लाखाचा टप्पा पार केला ही समाधानाची बाब आहे, एका दिवसात एक लाखाहून अधीक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले आहे, मात्र लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही, लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी कोरोनामुक्त गावांचा अनुभव इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा कोरोनामुक्त गावांचा अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार शरद रणपिसे, आमदार राहुल कुल, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, डॉ.सुभाष साळुंखे यांनीही काही सूचना केल्या.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर, ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ndx aka hello my website is prediksi ct
beyblade phần hello my website is exe games
skubidubidu film hello my website is gomen latin
php script hello my website is ghibli scenery
resumaker hello my website is exo louder
berdasarkan peraturan hello my website is hero slot88
100 rtp hello my website is broadcast today
sicbo slot hello my website is 371 last
lyrics beethoven hello my website is abs challenger
It’s really a nice and helpful piece of information. I am satisfied that you shared this helpful
info with us. Please keep us informed like this. Thanks for sharing.