पुणे (प्रतिनिधी)
प्रभाग क्रं. 26 महंमदवाडी – कौसरबाग मध्ये काळेपडळ, चिंतामणीनगर, सातवनगर, हांडेवाडी रोड मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत होता. प्रशासनाला जाग आणण्यासाठी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने झाली या पाठपुराव्यास यश आले असून टाक्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे 30 ऑगस्ट ला उदघाटन करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. नगरसेवक नाना भानगिरे यांच्या लढ्याला यश आले असून प्रभागातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
नगरसेवक भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसह क्षेत्रिय कार्यालय, लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र, पुणे महापालिका मुख्य इमारत, महापालिका आयुक्त दालनात केली. सन 2015 साली अखेरीस सलोनी पार्क, काळेपडळ येथे 25 दशलक्ष लीटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरु झाले. टाकीचे काम सुरु होऊन काहीच दिवस उलटले होते, टाकीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचा पुणे महापालिकेच्या काळ्या यादीत समावेश करण्यात आला. त्या कालावधीत जवळ जवळ दिड ते दोन वर्षे टाकीचे बांधकाम रखडले होते.
स्थायी समिती सदस्य असताना स्थायी समितीच्या बैठकीत नाना भानगिरे यांनी वेळोवेळी आवाज उठवला. परंतु हे रखडलेले बांधकाम मार्गी कसे लागेल याकरिता नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे सत्र सुरु ठेवले पण यास दाद भेटत नसल्याचे लक्षात आल्याने आंदोलनाचा मार्ग अवलंबवला त्यामुळे कामाला पुन्हा सुरुवात झाली. मुख्य सभेत नाना वेळोवेळी रखडलेल्या टाकीचे काम पूर्ण का होत नाही असा सवाल करीत प्रशासनाला धारेवर धरत होते. टाकीचे काम आता 70% पूर्णत्वास आले होते, तोच कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूने जीवन स्तब्ध केले. यातच टाकीचे काम पुन्हा थांबले. मागील दोन वर्षात प्रकल्पांसाठी मिळणारा निधी आरोग्य खात्याकडे पूर्णपणे वर्ग करण्यात आला. त्यामुळे टाकीचे काम पुन्हा रखडले, हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असताना नगरसेवक भानगिरे पुन्हा सलोनी पार्क येथील पिण्याच्या पाण्याचे टाकीचे राखडलेले काम पूर्ण करण्याचा चंग बांधला व कामास नव्याने सुरुवात केली. त्याच अनुषंगाने महापालिका आयुक्त साहेब, गटनेते पृथ्वीराज भाऊ सुतार यांच्या समवेत शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट व यांनी प्रभागातील पाणी प्रश्न मांडला. याची दखल घेत टाकीच्या अंतिम टप्प्यातील बांधकामाला सुरुवात झाली आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी टाकीचे उदघाटन होणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.
“प्रभाग 26 व परिसरातील पाणीपुरवठा होणार सुरळीत”
गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत होते, सेलेना पार्क पाण्याच्या टाक्यांच्या कामात अनेक अडथळे आले,महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला वेळप्रसंगी आंदोलने केली हा प्रश्न मार्गी लागला असुन येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल.
प्रमोद नाना भानगिरे
नगरसेवक पुणे मनपा