मुंबई

कोरोना काळातही महाराष्ट्रात सुपोषणाचे तरंग

५ ऑगस्ट २०२१, मुंबई
जागतिक ‘ब्रेस्टफिडींग विक’ हा १ ऑगस्ट पासून आठवडाभर साजरा केला जातो.त्या अनुषंगाने तरंग सुपोषित महाराष्ट्राचा उपक्रमाचा वापर होणे क्रमप्राप्त असल्याने पोषण अभियानांतर्गत सुरु आहे. कोरोना महामारीच्या काळात या सेवेत खंड पडु नये आणि बाल संगोपन आणि सुपोषण नियमितपणे आणि सुयोग्यरित्या व्हावे यासाठी राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत राबविल्या गेलेल्या तरंग सुपोषणाचे या मोहिमेमुळे लाखो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. व्हाट्सअप चॅट, प्रत्यक्ष फोन याद्वारे हजारो लाभार्थ्यांनी माहिती घेऊन समुपदेशन आणि इतर बाबी योग्यरीत्या नियोजित केले आहेत आणि आता तरंगत सुपोषणाच्या माध्यमातून 80 80 80 90 63 हा फोन क्रमांक परवलीचा क्रमांक ठरला आहे.
यासंदर्भात बोलताना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ताई ठाकूर या म्हणाल्या की, “गेल्या वर्षी कोविड काळात माझ्या विभागाने डिजीटल प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणावर काम केलं. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या डिजीटल प्लॅटफॉर्म मुळे आपण सर्व गर्भवती महिला आणि स्तनदा मातांशी सातत्याने थेट संपर्कात आहोत. व्हाट्सअप चॅटबॉट तसंच आय व्हीं आर व्हॉइस कॉल्स मुळे तात्काळ माहिती मिळवणं सोपं जात आहे. सक्षम महिला, सुदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र हे विभागाचं ब्रीद आहे, त्या दिशेने ही एक चांगली वाटचाल आहे. गेल्या वर्षी आपण देश पातळीवर पोषण अभियान अंतर्गत पोषण माह मध्ये पहिला क्रमांक मिळाला, सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आपली पोषण चळवळ व्यापक होत आहे. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा मुळे बाळाच्या पहिल्या १००० दिवसांमधली काळजी चांगल्या प्रकारे घेतली जात आहे. हा उपक्रम राबवणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, राजमाता जिजाऊ मिशन आणि सर्व अंगणवाडी सेविका-पर्यवेक्षिका यांचे काम खरोखरच स्त्युत्य आहे.”
तरंग सुपोषण अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात आय व्ही आर हेल्पलाइन, व्हाट्सअप चॅट बोट, ब्रॉडकास्ट फोन आणि संदेश प्रणाली तसेच एक घास मायेचा आजीबाईच्या गूजगोष्टी या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. महामारी च्या काळातही संभाव्य लाभार्थ्यांची संवाद सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाचा तरंग सुपोशित महाराष्ट्राचा हा एक उत्कृष्ट डिजिटल उपक्रम आहे टेली न्यूट्रिशनच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे कारण आपण आपल्या एका बोटाच्या क्लीकवर पोषण आणि मुले, गर्भवती महिला, स्तनपान करणारी माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित माहिती मिळवू शकता. वयानुसार पोषण समुपदेशन सीडी आणि प्री स्कूल ईसीसी उपक्रमाद्वारे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी घरी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे व्यासपीठ अत्यंत प्रभावी म्हणून काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया या विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात सक्षम महिला सुदृढ बालक कुपोषित महाराष्ट्र ही संकल्पना राबवताना सशक्त महिला चांगल्या पोषित महाराष्ट्रासाठी सर्वांगीण विकसित मुले हे ध्येय साध्य करण्याचं महिला आणि बाल विकासाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कोरोना काळात आयव्हीआर हेल्पलाइन सुरू करण्यात आली. या हेल्पलाईन द्वारे फोन क्रमांकावरून पोषण आणि बालकांच्या संगोपनाच्या संदर्भातील विविध पैलू बाबत आधी रेकॉर्ड केलेले संदेश पाठवण्यात येतात या संदेशासाठी त्यांचे अभिप्राय देखील पाठवू शकतात आतापर्यंत या माध्यमातून 15 लाख 76 हजार 300 फोन करण्यात आलेले आहेत तर चार लाख 58 हजार 995 संदेश पाठवण्यात आले आहेत व्हाट्सअप ,चाटबोट च्या माध्यमातून आतापर्यंत दहा लाख 12407 लाभार्थ्यांनी प्रतिसाद नोंदवला आहे त्यापैकी आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 52 हजार 295 जणांपर्यंत संदेश पोहोचला आहे. बरखास्त फोनला उत्तर देणाऱ्या लाभार्थ्यांची एकूण संख्या सहा लाख पाच हजार इतकी आहे तर प्रति वापर करता सरासरी वेळ दीड मिनिटांची आहे ब्रॉडकास्ट संदेश 6 लाख 30 हजार 841 जणांना पाठवण्यात आलेत. एक घास मायेचा या उपक्रमांतर्गत महामारी आणि त्यानंतरच्या टाळेबंदी कालावधीमध्ये मुलांच्या आहाराकडे दुर्लक्ष होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गर्भवती महिलांसाठी विविध पौष्टिक पाककृती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या एक घास मायेचा फिलिंग विथ केअर याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला स्तनपान करणारी माता आणि स्वच्छता पद्धती आणि प्रतिसादात्मक आहार याबाबत सहाय्यक मार्गदर्शन असलेले हे व्हिडिओ व्हाट्सअप चाटबोट सह संकलित केले आहेत तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले आहे. आजीबाईंच्या गोष्टी या तरंग सुपोशित महाराष्ट्राच्या अंतर्गत असलेला आणखी एक उपक्रम या उपक्रमाद्वारे मुलाच्या पहिल्या शंभर दिवसांची संबंधित विविध समाज गैरसमजांना संबोधित करण्यासाठी एक ॲनिमेटेड चित्रफीत मालिका तयार करण्यात आली आहे ही मालिका घराघरात पोहोचून गैरसमज आणि महामारी मुळे निर्माण झालेल्या भीतीवर मात करणारी आहे व्हाट्सअप द्वारे प्रसार करण्यासह सोशल मीडियाच्या माध्यमातून सात हजारांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.