हडपसर, वार्ताहार
साधना विद्यालयातील विद्यार्थी विविध शालेय परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून शाळा आणि संस्थेचा नावलौकिक वाढवतात. सन 2020/2021 या शैक्षणिक झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती म्हणजेच N.M.M. S परीक्षेत साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. परीक्षेसाठी विद्यालयातून 124 प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 62 पात्र ठरले. आणि 29 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी मिसाळ ओम अंकुश,खरात सुबोध बापूराव,बनकर वेदांत सचिन, मानकर सिद्धेश्वर सुभाष, महाजन चेतन सुभाष,पवार अभिजीत कुमारअमर,कुंभार साहिल बालाजी,क्षीरसागर अभिषेक महेश,मांढरे अभिषेक राजेंद्र, बुधवंत रोहित गणेश,वडनेरे वैभव अनिल,फुंदे धीरज परमेश्वर, कुदळे साईराज दीपक,माळी विजय वेंकटेश,शिंदे राजवीर अनंतपाल, गिरमे सुरज गणेश,जाडकर सुमित प्रशांत,दुतोंडे सोमनाथ गजानन,हिरतोट गणेश शिवलिंगआप्पा,मुसळे संकेत संभाजी,चौधरी हर्ष प्रशांत, सूर्यवंशी सार्थक वाल्मीक, बारस्कर यश भाऊसाहेब,गुंजाळ यश प्रवीण,खोकले विशाल बबन, गायकवाड अक्षय शंकर,बिनवडे ऋषिकेश नवनाथ,तेलगणे विश्वनाथ धोंडिराम,बावकर पियुष किशोर*
शिष्यवृत्ती वर्गांना मार्गदर्शन करणारे सर्व विषयशिक्षक,सर्व पालक, बाह्यव्याख्याते,तसेच नियोजन करणारे पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,प्रल्हाद पवार,दिलीप क्षीरसागर यांचे संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन दादा तुपे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य दिलीप आबा तुपे,जनरल बाॅडी सदस्य अरविंद तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, विद्यालयाचे प्राचार्य ,आजीव सेवक विजय शितोळे यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.