पुणे

सुप्रियाताईंकडून कोरोना वॉरियर्सना रक्षाबंधन – पुण्यात राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात कार्यक्रम

पुणे : कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करून कित्येक रुग्णांना जीवदान दिलेल्या कोरोना वॉरियर्स बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत महासंसदरत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राखी बांधून औक्षण केले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी सर्व कोरोना वॉरियर्सनी केलेल्या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता व आभार व्यक्त केले. तसेच, रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून औक्षण केले. या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, अर्चनाताई घारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी ससून हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. अजय तावरे साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंडे साहेब (शिवाजीनगर पोलीस स्टेशन), पोलिस उपनिरीक्षक मोरे साहेब (शिवाजीनगर पोलीस स्टेशन), गिरीश कळसकर, दिनेश जाधव (कीटक फवारणी विभाग, पुणे महानगरपालिका), राजू गायकवाड (स्वच्छता मुकदम पुणे महानगरपालिका), गोपाळ जांभे, शरद बोकरे (रुग्णवाहिका चालक), योगेश कदम, अरुण जंगम (स्मशानभूमीतील कर्मचारी), सागर जाधव (पत्रकार), मैथ्यू मथान (स्वयंसेवी संस्था) यांना आदरणीय सुप्रियाताईंनी राखी बांधली व कोविड योद्धा सन्मानपत्राने गौरव केला.

कार्यक्रमास मृणालिनी वाणी, महेश हांडे, सचिन घोटकुल, विशाल मोरे, गणेश नलावडे, मोनिका झुरूंगे, नीलक्षी खिरीर, सुषमा सातपुते, विजया भोसले, अक्षदा राजगुरू, रेणुका चलवादी, स्नेहल पायगुडे , श्रद्धा जाधव, कृतिका राजेमहाडीक, प्रेमा पाटोळे, ऋतुजा देशमुख, सोनाली गाडे, आबोली सुपेकर, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अभिषेक जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अश्विनी परेरा व पूजा बट्टेपाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.