रत्नागिरी

#Big Breking News : अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना घेतले ताब्यात

रत्नागिरी : (Rokhthok Maharashtra Online ) –

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सत्र न्यायालयात दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली. नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील जामीनासाठी अर्ज केला असून मुंबई उच्च न्यायालय राणे यांचा अर्ज स्वीकरत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणार की फेटाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या  विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं  एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं.
त्यानंतर राणे यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.
मात्र, त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

दरम्यान, नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला आहे.
पोलिसांकडे राणेंना अटक करायला आहेत परंतु त्यांच्याकडे वॉरंट नसल्याचे जठार यांनी सांगितले.
नारायण राणे यांना अटक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर रत्नागिरीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.