मुंबई : (Rokhthok Maharashtra Online ) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटताना दिसत आहे. राणे यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने- सामने आल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी आंदोलने आणि दगडफेक देखील झाले आहे. काही वेळापूर्वी नारायण राणें यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, याआधी या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मी त्याला फारसं महत्व देत नाही…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला असता पवार यांनी किरकोळ शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले की, ‘मी त्याला फारसं महत्व देत नाही असं म्हणत त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नारायण राणे यांच्या विधानावरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
या वक्तव्यावरून राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
तर, त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं.
तसेच, पुण्यात देखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तेही पथक रवाना झालं होतं.
तत्पूर्वी राणेंनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
परंतु, राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र कोर्टाने फेटाळला आहे.