पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
नगरसेवक मारुती तुपे यांच्या पुढाकारातून हडपसर मधील गांधी चौकात “आय लव्ह हडपसर” नामफलकाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, नगरसेवक मारुती तुपे यांनी हडपसर चे प्रश्न, येथील आपल्या समस्या महानगरपालिकेमध्ये अगदी मुख्य सभेमध्ये सुद्धा पोटतिडकीने मांडले आहेत, येथील विकासकामांसाठी आग्रह करून निधी आणला आहे. पुण्याचे उपनगर हडपसर ऐतिहासिक आहे, हडपसर हे फार वाढत चालले आहे मागील निवडणुकीत आम्हाला हडपसर मधील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडून दिले त्या दिवसापासून ई लर्निंग स्कूल, सेमी इंग्लिश स्कूल, अग्निशामक केंद्र, दवाखाना, उद्यान, अण्णाभाऊ साठे भवन, वारकरी भवन, अशी नागरिकांची आवश्यक ती वेगवेगळी कामे करण्याचा प्रामुख्याने विचार केला. हडपसर ऐतिहासिक आहे म्हणून “आय लव हडपसर” ही संकल्पना राबवली असे नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी सांगितले. याप्रसंगी गोरख तुपे, धनंजय कामठे, ओंकार तुपे, राजू महाडिक, सतीश भिसे, कुणाल चौरे, बाळासाहेब मांडे, गणेश आबनावे, धोंडाप्पा मलगे, ओंकार ससाणे, ऋषिकेश जगताप, राधा बेळगे, शिवा शिंदे, बाळा केदारी व मारुती तुपे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.