पुणे, दि. 8 : पुणे विभागातील 18 लाख 96 हजार 822 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 60 हजार 158 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 22 हजार 873 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 463 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.77 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 21 हजार 923 रुग्णांपैकी 10 लाख 94 हजार 359 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 914 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.54 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 42 हजार 666 रुग्णांपैकी 2 लाख 28 हजार 993 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 576 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 96 हजार 110 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 542 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 693 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 608 रुग्णांपैकी 1 लाख 87 हजार 96 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्य 2 हजार 392 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 4 हजार 851 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 832 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 298 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 721 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 991 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 832, सातारा जिल्ह्यात 360, सोलापूर जिल्ह्यात 321, सांगली जिल्ह्यात 319 तर कोल्हापूर जिल्ह्यात 159 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 610 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1115, सातारा जिल्हयामध्ये 593, सोलापूर जिल्हयामध्ये 357, सांगली जिल्हयामध्ये 389 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 156 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 57 लाख 97 हजार 946 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 60 हजार 158 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)